श्री
ज्या अवस्थेत आहोत, त्यातून सूक्ष्म ह्याकडे जायचे आहे/ व्हायचं आहे. अवस्था प्रवाह आहे, ज्याला सध्या आपण बिंदू समजतो, स्थळ आणि काळ निर्माण करतो आणि त्याचा अर्थ लावतो. ह्या सर्व गोष्टींना आपण जिवंतपणा म्हणतो. प्रत्येक घटकांचा त्याच त्याचा स्वभाव धर्म आहे आणि त्यातून आपण झालो आहोत आणि ते आपल्याला दृश्यात रमून ठेवत. आपण एक आकार आहोत - प्रत्येक घटक वासने पासून ते विचार ते भावना ते शरीर वेगळा " आकार " दर्शवतो ( form of Being ). प्रत्येक आकाराचा स्वभाव, परिणाम, क्रिया, हेतू, विषय, प्रश्न, शोध, समजूत, अर्थ, संबंध असतो. प्रत्येक आकार हा प्रवाह असतो, त्याचे चढ उतार असतात, तो बदलत राहतो.
म्हणजे बिंदुचा शोध घेणे ह्याचा अर्थ सर्व प्रवाह थांबून ठेवणे असे आहे - जे शक्य तरी आहे का आणि नैसर्गिक तरी असेल का?!! बुद्धी बिंदूचा शोध घेते - आणि सुख किंव्हा दुःखाची संकल्पना त्यावर _अवलंबून_ करते! ही महत्वाची गोष्ट आहे. समाधान कसे मिळेल?
मुळात अशी ओळख व्हायला हवी, की सध्याची कुठलीही स्थिती असली, कुणी कसेही वागत असले, काहीही कुणी बोलले, काहीही दिसले, काहीही घडले, कसाही आणि कुठलाही घटकामध्ये बदल झाला, मी कसाही असलो, कुठलाही विचार मनात आला, _तरी समाधान तिथेच असते._
ही ओळख गूढ आहे. ती फक्त बौद्धिक नाही, कारण बुद्धी देखील स्वतंत्र नाही - तिचा स्वभावही इतर घटकान बरोबर मिसळलेला असतो. सर्वांगीण ओळख पटणे ही मागणी आहे. त्याचा सरळ अर्थ असाही नाही की एका धाग्याने कोडं सुटेल किंव्हा एक धागा इतर धाग्यान बरोबर कसा गुंतला असतो हे बघणे. त्याला पुढे नाही, मागे नाही, काळ नाही, स्थळ नाही. त्याला मी ही संकल्पना नाही. स्वतंत्र दिसणारे आकार ठीक करायला हवे, असे मानणे फसवे आहे. सर्व प्रवाह आहे आणि शांतीच्या छटा आहेत, अशी ओळख स्थिरावयाला हवी.
A dot or an aspect need not be a worldly focus to feel satisfied. Everything has to be felt in a direct manner.
हरि ओम.
No comments:
Post a Comment