Sunday, 31 May 2026

श्री

श्री 

काही लोकांचे प्रश्न, माझ्या मते, गहन होतात आणि ते फक्त ऐकावे लागतात समोरच्याने. ते प्रश्न मांडता येतात त्या लोकांना असे नाही, पण त्याचा परिणाम त्यांच्या जाणिवेत खूप खोलवर झालेला दिसतो आणि त्या पद्धतीने व्यवहार ते इतरांन बरोबर करायला घेतात. 

प्रश्न मुळात विचारण्यासाठी नसावेत आणि त्यावरून इतरांनी सांत्वन करावे, ही अपेक्षा देखील कितपत योग्य आहे, हे बघावे. प्रश्न स्वतःला पडलेला असतो, अस्तित्वाचा, कार्याचा, संबंधाचा, परावलंबनाचा, भावनेचा, मर्यादेचा वगैरे. परिस्थिती प्रश्न सोडवते का? की काही त्यासाठी वेगळे प्रयास लागतात? हा असावा _शोध_. शोध हाती घेणे, हा स्वाभाविक गुण आहे जीवाचा आणि तसा तो केल्याशिवाय काही चैन पडत नसावे कुणालाही. पण त्यासाठी व्याकुळ व्हावे का? हा परत ज्याचा त्याचा प्रश्न आहे...तसे ठाम उत्तर त्या प्रश्नाला कदाचित नसावे. 

मानवी समाजामध्ये असे वयोमानाचे लोकं संपर्कात येतात - जसे की लहान मुले किंव्हा वृद्ध व्यक्ती - ज्यांचे म्हणणे फक्त ऐकून घ्यायला लागते. प्रश्न खूप विकट असावेत त्यांचे आणि काहीही केल्या त्यांचे उत्तरे कुठल्याही दृश्याच्या भाषेत/ व्यवहारात/ संबंधात सापडत नाही. त्यामुळे वृद्ध लोकांची व्याकुळता कायम राहण्याची शक्यता खूप वाढू शकते. लहान मुले काय की वृद्ध लोकं काय, त्यांना वेळ, स्थळ, नाती असल्या बंधनाशी विशेष व्यवहार अवलंबून करण्यात रस नसतो. त्यामुळे त्यांचा संवाद खूप निराळा होतो, विचार वेगळे असतात, भावना वेगळ्या असतात. 

काम करणाऱ्या मंडळींना हे पचनी पाडायला लागते. संवाद जर - तर ह्या भाषेतील नसते, धडपडीचे नसते, काहीतरी कोडे सुटण्याची अपेक्षा नसते, वेळेचा आभास असतो अशी जाणीव शिथिल झालेली असावी, कधी कधी त्यांच्याच पूर्वीच्या स्मरणात मन रममाण होत राहते, अट्टाहास कोडी सोडवण्याचा रहात नसावे, वगैरे.

एका बौद्धिक अर्थाने, वरील जाणीव खूप निराळी ठरते दररोजच्या व्यवहाराच्या तुलनेने. पण मानवी जाणीव आणि सत्याच्या पार्श्वभूमीवर, ह्या लोकांना समजून घेणे आणि स्वीकारणे शक्य होऊ शकते. 

खरे पाहिले तर आपले स्वतःचे अनुभव देखील ह्या सर्व रूपातून जात असतात/ जाणार असतात. कधीतरी आपण लहान असतो आणि प्रेमाशिवाय दुसरी कुठलीच भाषा त्यावेळी ध्यानात आलेली नसते. वृद्ध लोकांसाठी कदाचित सत्य आणखीन प्रखरतेने जाणवल्यामुळे त्यांचे मन कदाचित आणखीन मोकळे झालेले असते. काम करणाऱ्या लोकांना जरा व्यवहारात गुंतायला लागत असावे मात्र. 

पण प्रश्न असा उद्भवतो, की व्यवहारात गुंतताना स्वतःला इतके स्वार्थी का करावे आणि इतके कसे परावलंबी करावे, की कुणाचीही पर्वा असू नये?! मग ह्याला _प्रगती_ कुठल्या अंगाने म्हणावी?!! 

काही लोकांचे म्हणणे असे असते की हा नैसर्गिक क्रम आहे, तर स्वार्थीपणा कधी ना कधीतरी येणार प्रत्येकाला. मला माहित नाही ह्या बद्दल विचार करताना....म्हणजे स्वार्थी होणे, हे कदाचित तिथे मन खेचले जाऊ शकेल, पण मनुष्य मग कशाला म्हणायचे? की कुठल्याही प्रसंगी, शिस्त लावून, शांतीचे ध्यान करत व्यवहारात गुंतत राहावे.  आणि असा नक्कीच निश्चय करायला लागतो आणि तिथेच बुद्धीची कस लागते. There is going to be a struggle.

आता अजून एक मुद्दा असा की प्रश्न जर स्वतःचा शोध आहे, तर तो इतरांनी सोडवायला हवा का किंव्हा इतरांची त्यामागची भूमिका काय ठरते? तर उत्तर असे सुचविले आहे की इतर जण "निमित्त" ठरतात प्रश्न सोडवण्यासाठी. प्रश्नाचे उत्तरे इतरांनी द्यावे हे काही बंधनकारक नाही, कितीही स्वतःला वाटलं तरीही. प्रश्न खूप गूढ असतो आणि त्याचे उत्तर ज्याने त्यानेच आत्मसात करायचे असते/ करावे लागते.

हरि ओम.

श्री

श्री 

स्पष्टीकरण देणे आणि पारदर्शक असणे, ही एक संकल्पना आहे. ह्यात बरेच घटक आहेत, तरीही आपण प्रामुख्याने ह्याकडे काही अंगाने बघूया -

मनुष्य स्वभाव किंव्हा जीवाचा भाव, ह्याचा एक गुण धर्म प्रस्थापित झाला असतो अस्तित्व शक्तीतून. तो असा की त्यात बरेच स्तर, साखळी, संबंध, विचार, भावना, देह व्यवहार करत राहतात आणि त्यामुळे त्यांचा एकंदरीत ध्यानात परिणाम होत राहतो. त्यामुळे अपुरेपण, तात्पुरतेपण, वेगळेपण, भीती, राग, मर्यादित राहणे, ममत्व अशा भावना प्रस्थापित होतात. त्यांच्या प्रभावाखाली माणसाला दृश्य बद्दल आसक्ती निर्माण होते, त्यात तो गुंतून राहतो, कोडी सोडवण्याचा आटापिटा करत राहतो आणि *काहीतरी मोजके सांगू शकतो आणि काहीतरी लपवून ठेवतो (अर्ध सत्य)* . एका दृष्टीने हे नैसर्गिक आहे की माणूस काहीतरी लपवणार (त्याची गरज त्याला भासेल, इतकेच नव्हे तर ह्या स्वतःच्या मनोरचनेत तो सतत गुंतून राहील) आणि दुसऱ्या दृष्टीने हा दोष आहे शुद्ध होण्याच्या मार्गावर.

हा स्वभाव बरोबर करण्यासाठी एक पर्याय बुद्धीने शोधण्याचा प्रयत्न केला आहे की - सगळ्याच गोष्टींचे स्पष्टीकरण देत रहाणे - की संबंधांचे मूळ, साखळी, व्यवहार, निर्णय, वस्तू, परिणाम...सगळच. This is the modern way of defining transparency in communication. ह्यात इतर खूप घटक आहेत, जसे की विघटित होणारी क्रिया, भीती, बुद्धिवादीन स्वभाव, स्वावलंबी होण्याची सतत धडपड, effeciency, वगैरे. पण असे दिसून येते की एका मर्यादेच्या पलीकडे ही मागणी करत गेलो, तर त्याने मन दुखावते, कष्टी होते, त्रासिक होते, दुःखी होते. ह्याचा अर्थ की मनाची गरज आणि त्याचा योग्य पद्धतीने स्वीकार करण्याचा अभ्यास घेतलेला दिसत नाही आहे. 

आता दुसरा मार्ग म्हणजे आध्यात्मिक वाटचाल. ती अशी की मनुष्य मान्य करतो, की स्वतः मध्ये असे काही अवगुण असावेत, जेणेकरून मर्यादा प्रकट होत राहतात, गरज निर्माण होते, गुंतणे येते, आणि सर्व अनुभव संक्रांत होण्याची गरज निर्माण होते. त्याला "दोष" न मानता, ह्या अवगुणांना शांत कसे होऊ द्यावे, हा आध्यात्मिक प्रश्न निर्माण होतो. मग मार्ग आध्यात्मिक असणार साहजिकच...फक्त बौद्धिक नाही. दररोज विचार येतील, प्रभाव घालतील, आणि त्यातून परिणाम अनुभवात येतील. विचारांचे होणे, वावरणे, परिवर्तित होणे, ही शक्ती असावी, ज्यात अनेक स्तर असावेत आणि त्यांचे कार्य आपला भाव निर्माण करत असावेत. असे असल्यास, आध्यात्मिक शोध त्या सूक्ष्म स्तराचा होतो, ज्यावरून सत्याची प्रचिती येते.

हरि ओम.

श्री

 श्री 


मला वाटतं की स्पष्टीकरणाची गरज निर्माण केली गेली असावी... ती पहिल्यापासून नसावी. 

हा गूढ प्रश्न आहे, की स्पष्टीकरण कशी मनात संक्रांत झाली आणि त्यात सार्वजनिक आणि व्ययक्तिक दोन्ही घटक सामील असावेत. 

मन जसे बदलत गेले, तशी ही स्पष्टीकरणेची भूमिका (आणि त्यातून इतिहासाची गणना) झाली असावी. त्यातून _मूळ_ ह्या शब्दाची संकल्पना मांडली गेली असावी. 

एकंदरीत, इथे वाटचाल बौद्धिक शक्तीकडे दिसून येते, जी कदाचित परिस्थिती त्याच्या अगोदर वेगळी असावी, म्हणून बदल, स्मरण, इतिहास, मूळ - अशा संकल्पना मांडण्याचीही गरज नसेल का?! 

एक व्याख्या प्रगतीची म्हणजे _प्राचीन_ संकल्पना, _भविष्य_ संकल्पना आणि जोडणारे दुवे असा काहीसा दिसून येतो, आणि त्या प्रमाणे प्रवाहाकडे बघितले जाते.

पण प्रश्न असा आहे, की सत्य कदाचित ह्या पलीकडेही असेल (म्हणजे आपण मांडलेल्या संकल्पनेच्याही पलीकडे), आणि त्यात "चक्र", अदृश्य, दृश्य, परिवर्तन, गुढत्व, संबंध - अशा गोष्टींची जागा असावी! 

तसे असल्यास, अभ्यास गहन असावा मूळ जाणून घेण्याचा किंव्हा आत्मसात होण्याचा. आपण कशानेही ठरत नसतो - ना प्राचीन, ना भविष्य, ना आत्ताचा क्षण. आपण फक्त "असतो".

हरि ओम.

Friday, 29 May 2026

श्री: काही विचार

 श्री: काही विचार


संकल्पना, किंव्हा होणाऱ्या गोष्टींचे चिंतन, प्रत्यक्ष अनुभव वावरत होताना, आणि परिणाम भोगण्यातून होणारे चिंतन - ह्या तिन्ही गोष्टीतून शांत होण्याचा मार्ग निघतो....म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींना "सामोरे" जायला लागते. त्याला आपण अनुभवांचा प्रवाह असेही म्हणून शकतो आणि त्यातून घडणारा प्रवास जाणिवेचा. अध्यात्म अभ्यासात ह्या तिन्ही गोष्टींचा उल्लेख केला आहे - की योग्य विचार म्हणजे काय, प्रत्यक्ष अनुभवात जाणीव कशी असावी आणि परिणामांकडे कसे बघावे....थोडक्यात हे सर्व ध्यानात असणारे चक्र आहे, किंव्हा _संबंधांचे स्वरूप_ आहे, म्हणून सर्व संबंधित असणाऱ्या गोष्टींवर टीका केली आहे. 

संबंध होत राहतात भगवंत इच्छेतून आणि एकातून एक अशा गोष्टी ध्यानात संक्रांत होतात. त्या गोष्टींचे चक्र म्हणजे स्तर,भाव, आतून ते बाहेर होणारी प्रक्रिया, भगवंत भाव ते दृश्याचे स्थान, दृश्य आणि मी ह्यात होणारा संबंध, भगवंत आणि मी, भगवंत आणि दृश्य वगैरे. 

विचार - हे काल्पनिक आहे, प्रत्यक्ष अनुभव संक्रांत करणारे आहे, भावनेतून निर्माण झालेले आहे, गूढ माध्यमातून स्थित झालेले आहे, चिंतनात असणारे आहे. म्हणजे सत्याचे अस्तित्व, त्यातून येणारा संबंध, त्यातून होणारा विचारांचा स्वभाव, त्यातून निश्चय क्षमता, त्यातून अनुभव, त्यातून परिणाम, त्यातून चक्र - असा काहीसा _गूढ संबंध अस्तित्वाशी जोडला गेलेला दिसत आहे._

 _सर्वांगीण अनुभव_ ह्याला म्हणत असावे आणि ते कसे योग्य व्हावे जेणेकरून शांती ध्यानात येते, हा अध्यात्म अभ्यासाचा ध्येय मानावा. त्यात सुचवलेले मार्ग, आणि त्यातील एक मार्ग म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

 *प्रत्यक्ष* सत्याला सामोरे जाणे आणि ध्यानात येऊ देणे सर्व काही असते. अस्तित्व, हा प्रत्यक्षाचा भाग आहे, म्हणून त्यात प्रत्यक्षपणे सारे स्तर, त्याचे कार्य, त्याचे संबंध, परिणाम, भोग, जाणीव - हा स्वतःच्या अनुभवातील घडणाऱ्या गोष्टी असणार आहेतच. 

ह्यावरून असे आत्मसात होणे आहे, की संपूर्ण कार्य, हे भगवंताच्या इच्छेमुळे प्रस्थापित होते...म्हणजे संपूर्ण प्रकाराचे जे काही संबंधांचे रूप निर्माण होत असतील ते. अशी एकही जागा नाही, किंव्हा एकही काळ नाही, किंव्हा एकही विचार नाही, किंव्हा एकही क्रिया नाही, किंव्हा एकही संबंध नाही - ज्यात भगवंताचे वास्तव्य नसते. म्हणून सर्व गोष्टींचे, स्वतः होण्याचे, परिवर्तनाचे - हे भगवंताशी जोडलेल्या गोष्टी असतात. 

हरि ओम.

Shree

 Shree 


Liberation from dependence through effective use of intellect is an illusion. The idea of liberation as conceived by intellect _may result_(unknowingly) in further isolation, aggression, speed, weird expectations, desperations, disconnections, fragmentation, rupture, exploitation and so on. 

Neither can the mind 'avoid' effects of vibrations. So, essentially there is a problem of acceptance of self/ existential phenomenon. The problem has no intellectual answer, according to me. And to find one, may land in an inversion idea of intellect, which again, may cause annoyance. How can intellect decode it's own beginning by its own language?!! 

Therefore there needs to be an approach of something different, _beyond_ the path that is felt by the intellect. 

Hari Om.


श्री 

वरील लेखाचे तात्पर्य हे, की विचारांचे मर्यादा आत्मसात व्हायला हवे आणि त्यातून मार्ग प्रस्थापित होण्याची निर्मिती होते. 

विचारांना खूप काहीसे संकल्पना कळून येतात संबंधातून - काल, आज, उद्या, स्मरण, नाती, रूप, आकार, भाव, साखळी, बदल, भावना, परिणाम, चक्र, अनेक स्तर, वगैरे. ह्याचा संबंध आणि ताबा कसा मिळवावा किंव्हा त्यातून कसे सुटावे, हा प्रश्न विचार उद्भवू शकतो, पण तो प्रश्न योग्य असतो का, हे ओळखावे.  

विचारांची भूमिका वरील कित्येक घटकातून उद्भवते किंव्हा स्थित होते, तर चिंता का करावी त्या होण्याची? विचारांचा साहजिकच स्वभावही होत असेल, जो जीवाला इकडे आणि तिकडे धावपळ करायला लावेल. तो स्वभाव शांतीने बघावा. त्यातून तो स्वभाव _मावळतो_ आणि शांतीचा अनुभव प्रस्थापित होतो. 

हरि ओम.

Wednesday, 27 May 2026

श्री

 श्री 


भगवंताचा _प्रश्न_ (महत्व, गरज, प्रयास, श्रद्धा, मार्ग, कृपा) निर्माण किंव्हा स्थित व्हायला कारण गूढ असते. कशातून ती गरज निर्माण होते, हे सांगणे कठीण...भगवत कृपा म्हणावी. 

जीव असा प्राणी आहे, की त्याला स्वतःच्या स्तराची, संबंधांची, परिणामांची, भोगाची, कार्याची जाणीव असते/ प्रखर करता येते. म्हणून त्याला पडणारे प्रश्न औरच असतात! त्या प्रश्नातून शोध स्थित राहतो, तो नंतर मार्ग बनतो आणि शेवटी सत्य दर्शनास आणतो. 

प्रश्नाची रचना आणि तिला साजेल असे उत्तर रेषेसारखे सरळ नसतात बहुतांश. सरळ नाही म्हणजे ते विचारांच्याही पलीकडे स्थित असते. अपुरेपण, तात्पुरतेपण, वेगळेपण - हा भाव सर्वांगीण सर्व स्तरात पसरलेला असतो किंव्हा स्थित असतो. म्हणून विचारांच्या शक्तीवर समाधानकारक उत्तरे सामावलेले नसतात. 

दररोजच्या दृश्यात वावरताना हालचाली हे टप्पे किंव्हा निमित्त मानावे. म्हणजे त्यांचा परिणाम शांत होण्यासाठी व्हावा, नाही की व्याकुळता प्रस्थापित होण्यासाठी. 

प्रत्येक जीवाचे त्याचे त्याचे रूप असते, विचारांची पद्धत असते. त्यातून मार्ग आत्मसात व्हावा लागतो. प्रत्येकाच्या वाट्याला प्रवास आहे, त्याला तो पत्करावा लागतो, त्याचे देणे असते, तो स्वीकारावा लागतो, त्यात कार्य करावे लागते, त्यात शरण जावे लागते. सैय्यम ठेवावा आणि शांत व्हावे.

हरि ओम.




श्री 

व्यवहार किंव्हा द्वैताशी संबंध प्रस्थापित होणे आणि स्वतःशी/ अंतर्मुख होण्यात संबंध प्रस्थापित होणे, ह्यांचे त्या त्या स्थितीत परिणाम होत राहतात आणि एकमेकांशीही संबंधित असतात. 

त्याकडे शांतीने नुसते बघावे. त्यातून काही अभिप्रेत असते का? काही मिळवायचे असते का? काही हेतू असायला हवा का? हे प्रश्न त्वरित संपणे अशक्य. ते प्रश्न असतात, म्हणून नकळत सत्याचा शोध होत राहतो. जीवात शोध, _हे कार्य_, स्थित असते, म्हणून शांतीचे दर्शन कधी ना कधीतरी होणार. त्यावर श्रद्धा ठेवावी. 

हरि ओम.

श्री

 श्री 


दर रोज व्यवहार करत असताना जाणीव रेषेसारखी किंव्हा गोलाकार किंव्हा विलीन - ह्या तिन्ही स्थितीत वावरू शकते किंव्हा वावरण्याची परिस्थिती उद्भवू शकते. जाणिवेचे रूप कसेही जरी होत असले त्या क्षणी, तरीही जाणीव भगवंताची शक्तीच आहे ह्या भावनेत कायम स्थिर असायला हवी - म्हणजेच की मुळातील सर्व प्रकाराचे संबंध, प्रवाह, स्तर, कार्य हे भगवंताने प्रकट केले आहेत, असे ओळखणे आणि कायम त्या ध्यानात राहणे. ह्याला "स्थिर होणे" असे म्हणतात, की स्मरण सतत भगवंताचे असते, अनुसंधान त्याचेच असते. 

आपण म्हणजे जीव, विषय सोडवणे कठीण. कितीही विचार केला, तरीही त्यातून अहं भाव प्रस्थापित राहतो. अहं भावाचे एक विशिष्ठ क्रिया असते, म्हणून परिणाम होतात. आपल्याला व्याकुळता येईल, दुःख होईल, कष्ट होतील, प्रश्न पडतील, दुविधेत असू, हे सगळं अहं भाव ध्यानात असल्यामुळे होणारा परिणाम. म्हणजेच एका अर्थी भावातून होणारी क्रिया, चक्र, संबंध, जाणीव आणि परिणाम (perception/ memory)!

दृश्यात वावरत असताना प्रश्न येणारच आणि मनासारखे गोष्टींच्या हालचाली नसणार. म्हणजेच सत्य वेगळेच असते, ही जाणीव होण्याची गरज आहे. आपण संबंध असे का लावतो, हा गूढ सवाल आहे. _संबंधांचे उत्तरे_ बुद्धी किंवा विचारात सामावलेले नाही, त्यासाठी शांत होणे अभिप्रेत आहे.

कुठल्याही परिस्थितीत शांत होण्याचा अभ्यास चालू ठेवावा.

हरि ओम.




श्री 

भगवंत जाणीव आहे, वस्तू नाही. सर्व वस्तू स्वतःतूनच येत असतात, तसेच भगवंत स्वतः मधेच ओळखायला हवा. ह्याला _दुहेरी_ परिणाम म्हणायचा जाणीव राखण्याचा. जाणीव म्हणलं तर दुहेरी परिणाम आला. 

 _सर्व गोष्टी होत राहतात_, गती असते, हालचाली असतात, बदल असतात, संबंध असतात.  हे ओळखावे, पचनी होऊ द्यावे, स्वीकारावे आणि शांत रहावे. 

दृश्याचे प्रयोजन काय, ह्यासाठी भगवंताचे चिंतन करत राहावे. हा सवाल बौद्धिक असतो का?! की आणखीन सूक्ष्मात सामावलेला असतो? प्रश्नाचे उत्तर आणि सूक्ष्मात पदार्पण होणे हे अवलंबून असते का?!! अवलंबून संकल्पना आपण निर्माण होऊ देतो - तसे प्रत्यक्षात होण्याची गरज नसते! 

आणि तेच शिकायचे असते किंव्हा जाणीव तशी होऊ द्यायची असते. 

हरि ओम.

Tuesday, 26 May 2026

श्री

श्री 

एकांतात बसणे, काही क्षण हेतू बाजूला ठेवून क्षण अनुभवणे ह्यात काही चुकीचे नाही. अनेक क्षण असतात की त्यात हेतू असतो, नसतो, बदलत राहतो, संबंधित गोष्टी आणतो वगैरे. म्हणजे अनुभव खूप प्रकाराचे संक्रांत होत राहतात, बदलत राहतात, दोऱ्या मध्ये ओवलेल्या जातात, वगैरे. सर्व त्या प्रकारे "संबंधितच" असते. हे _संबंध_ अस्तित्व कार्यातून उद्भवते, म्हणून संबंधांना मूळ _मानवी हेतू नसतो_ किंव्हा ते भगवत इच्छेतून स्थित होते.  

अहं भाव आणि त्याचे स्मरण राहणे, हा अस्तित्वातील एक भाग आहे आणि त्यातून येणारे विचार, भावना, वगैरे. ते गैर नाही, पण ते कायमही नाही. अहं भावनेतून गोष्टी जाणवतील, ते नुसते बघावे. म्हणल्या प्रमाणे, त्यात मानवी हेतू नसतो, म्हणून ते शांतीने बघावे, एवढेच अभिप्रेत आहे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


प्रवासात बंदपणा नसतो. प्रवाहात आणि संबंधित गोष्टी जाणवत राहतात. मध्य भागी स्थिरता असल्यामुळे, त्या पार्श्वभूमीवर प्रवास आणि प्रवाह _जाणवतो_. म्हणजे जाणिवेत दोन गोष्टी सामील आहेत - स्थिरतेचे माध्यम आणि प्रवास/ हालचाली/ बदल. त्यातून जो काही अनुभव संक्रांत होत असतो तो. म्हणजे त्या ओघाने देखील स्मरण स्थिरतेचे आणि दृश्याचे असे दोन्ही सामील असतात. किंव्हा स्मरणात अनंत कार्य, सामूहिक अंग, संबंधित अंग, कौटुंबिक अंग, व्यक्तीक अंग अशा छटा असतात. आणि त्यामुळे मनाला आत आणि बाहेर ह्या दोन्ही गोष्टींची जाणीव असते. "मन" हे मध्य भागी उभे आहे. 

सांगण्याचे तात्पर्य हे, की वास्तुकलेत वरील दोन्ही गोष्टींचे अस्तित्व _आकार_ देण्यात प्रभाव आणतात. Transcendence or permanence *and* movement. कलाकृती करताना नजर दोन्ही ठिकाणी ठेवण्याची गरज असते, म्हणजेच पलीकडील संकल्पना आणि विशिष्ट स्थळ - काळ अशी चौकट, दोघांना dnyay देता येतो. 

बऱ्याच वेळेला, चर्चा "आत्ताची परिस्थिती आणि त्या अनुषंगाने कलाकृती" असे काहीसे वादातीत मुद्दे पुढे आणले जातात. पण हे विसरू नये की स्थिर तत्वाच्या आधारे ही चर्चा आधारलेली हवी. तरच योग्य किंव्हा अयोग्य ह्याचा भेद होऊ शकतो. 

म्हणून _आकार_ , ह्या संकल्पनेत दोन्ही गोष्टींचे समावेश होणे गरजेचे असते. मी, पर्यावरण, लोकं, प्रश्न, अर्थ, भिंती, खिडक्या, हालचाली, आकाश, वारा...ह्यांची रचना दोन्ही संकल्पनेवर आधारलेली हवी.

हरि ओम.

Monday, 25 May 2026

श्री

 

श्री 

 संवादाला महत्व असते नकळत. एक तर श्रद्धा असावी की जे काही होत आहे, जे काही घडेल, जे काही आपण करणार असतो, जे काही ध्यानी येत राहते, ते योग्य असते आणि आपल्या हितासाठी असते. मग त्यात चर्चा, भेद, शांत बसणे, बदल, संबंध, चिंता - सर्व काही त्यात येते. 

 गोष्टींच्या _होण्याला_, जो काही काळ अस्तित्व मागतो, तो देणे गरजेचे असते. मग त्यात जन्म,मरण, जीर्ण होणे, प्रगती, बदल ह्या सर्व गोष्टी आल्या.  गोष्टींच्या हालचाली सूक्ष्मातून स्थूल स्थितीत _अवतरत_ राहतात आणि गडपही होत राहतात आणि हे कार्य भगवंताची शक्ती करते. म्हणून _हालचाली_ योग्यच असतात आणि त्याच्या इच्छेने होत राहतात. 

 श्रद्धा वाढवावी प्रवासात. पुढे काय लिहून ठेवले आहे, काय होईल, कसे होईल, काय देणे लागते, कुठे जायला लागते, कसा हेलपाटा पडू शकतो - सारे काही त्याच्या भरवसावर सोपवणे. आत्मसात होण्याच्या क्रियेला देखील देणे लागते अस्तित्वाला आणि ते द्यावे. 

 होणे - हे कार्य असते - ज्यात आपण फक्त देतो. ते बुद्धीवर निर्भर नसते - त्याच्याही पलीकडे स्थित असते, म्हणून होण्याच्या कार्यक्षमतेला भगवंताची शक्ती कारण ठरते, बुद्धी नाही. बुद्धीने जे काही संक्रांत होते (speculation), त्याच्याही पलीकडे अस्तित्व शक्ती कार्य करत राहते. एखादी गोष्ट होणे, ह्याला घाबरण्याचे काय कारण असते? आपली श्रद्धा किंव्हा शुद्ध जाणीव कमी पडते. म्हणून श्रद्धा वाढवणे. 

 हरि ओम.

 

 श्री 

 ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोण आहे, काय करतो, कुठे जाणार असतो, काय वाटते वगैरे - हे कुणाला पटवण्यासाठी नसते. मी कुठून येतो, हे मलाही ठाऊक नाही, तर त्या बद्दल अडून राहण्यात काय तथ्य असते?!! तरीही लोकं एकमेकांचे झिंझ्या उपटण्यात कमी करत नाही! 

 प्रवास कसा असतो, हे पूर्णपणे माहित नाही. प्रवास म्हणजेच भगवंताने आखलेला किंव्हा त्याच्या इच्छेने संक्रांत होत राहणार. प्रत्यक्षात परिस्थिती येत राहते. तिला सामोरे जायला लागते, त्यात दुमत नाही. आपल्या ध्यानी गोष्टींचा प्रवाह स्थित असणार. 

 हरि ओम.

 

 Shree 

 Emphasis to solve a problem at any cost may  imply a disconnect with surrounding concerns or less faith in deriving lessons from what the environment seems to say. 

 Why does this happen?! Not very sure of this....I don't wish to assume a deterministic stance since it is quite useless and what's the harm in admitting and accepting that there are far subtle forces at play which can't be even known by a thought! 

 It is not for us to solve any problem. A problem is a creation of the mind and how it gets defined how it gets engaged with and what outcome comes from it. It is never ending. A problem is a fictional idea. 

 The journey that has been inherited includes many problems. But that needn't define us. The problem requires to be seen. It doesn't indicate that there has to be an answer or one should force oneself to find out one.

 Hari Om.

 

Friday, 22 May 2026

श्री

 श्री 


भगवंताचे चिंतन आणि परिस्थितीचा एकमेकांशी बौद्धिक संबंध किंव्हा हेतू सहित संबंध जोडू नये. हेतू म्हणला तर स्वतःची अहं वृत्ती दर्शनास येते आणि तिथे भगवंताचा भाव नसतो. 

म्हणून हेतू रहित, स्वार्थी न होता, देह बुद्धी नमवून भगवंताचे चिंतन करत राहावे. जेवढ्या वेळेला तशी मनोरचना होईल, तितक्या पटीने संस्कार आत खोल जात राहतील. म्हणून जितक्या वेळेला भगवंताचे नाम घेण्याची आठवण होईल आणि घेतले जाईल, त्याचा अर्थ की मन अंतर्मुख होत आहे. 

जाणीव शुद्ध होण्याची वरील प्रक्रिया ओळखावी. आपल्या पेक्षा रूप,आकार वेगळे नाही. जे काही आत असते, तेच हेतू घेऊन बाहेर रूप आणि आकार होते. The form of architecture is also a reflection of this. 

प्रश्न असा आहे, की रूपाला, आकाराला मुल्य देऊन जिवंतपणा कसा येतो? स्पंदनातून. आपल्या आतील भावातून. म्हणून जिवंतपणाचे मूळ आत असते. दुसरी गोष्ट ही, की सध्या जिवंतपणा म्हणजे रूप, आकार,संबंध, बदल, दिसणे, असे संस्कार त्यावर आपण बहार केले आहेत. पण वास्तविक जिवंतपणाचे स्तर असतात, आणि काही सूक्ष्म स्तरात आकार किंव्हा रूप जरी नसले, तरीही हालचाली किंव्हा कार्य होत असते आणि जिवंतपणाचा रंग तिथे निराळा ठरतो. किंबहुना रूप आणि आकाराच्या सूक्ष्म गुणांचा वावर त्या स्तरात होत असतो. 

म्हणून जिवंतपणेची सगळ्यात सूक्ष्म अवस्था म्हणजे अस्तित्व भाव किंवा स्वतः सिद्ध भाव किंव्हा शांती भाव. तिथे कुठल्याही गुणांचा लाग होत नाही. 

त्याची सुरुवात तिथे होण्याची म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.

Thursday, 21 May 2026

Shree

 Shree 


You have to come to terms with movement, change, connections, memory - life and death. It is not a problem to be solved or controlled.

Or perhaps the idea of control is to realise the Truth. Realization is not a function, but an integral experience of awareness. 

It is a very deep level introspection. The journey of experiences or of perception is a mystery.

This journey may have its own concepts, engagements, pushes, pulls....one needn't comment on the _nature_ of journey. Journey is a given, inherited, passed on, continued.

Hari Om.


Shree 

Some people, even the one's who come to the inner orbit of your life, may not perhaps understand the depth of experience you are going through and the reasons for certain actions that would subsequently be undertaken. That's a journey we all undertake. Perhaps we look for reason, whereas the experience of Divinity is more important to realise than reason itself. 

Awareness or realization is not a function of reason. It should materialize independently. The phenomena are steps in that direction, not necessarily linear or lateral or circular or web. It is not our undertaking to say what should be or what shouldn't. 

All happens. 

Hari Om.

श्री

श्री 

संवाद अनेक प्रकारचा असतो. काही गोष्टी खूप सूक्ष्म असल्यामुळे, शब्दात मांडणे कठीण जाते आणि ते मांडले, तरी त्यात सहजता राहणे कठीण. 

सांगण्याचा उद्देश काय हवा? कोडी सोडवणे हा उद्देश शेवटचा असायला हवा. सर्व भगवंत करतो, तर वासना त्यांनी दिल्या आहेत, तर तो दोष का मानावा आणि त्यातून समस्या सोडवण्याची जबाबदारी का उचलावी?! आपण स्वतःच्या किंव्हा इतरांच्या वृत्तीतून ठरत असतो का?! 

कसे वागावे किंव्हा बोलावे, ह्यात हेतू असला, तर त्याने कष्ट होऊ शकतात. हेतू असणार जीवनात, ह्याला नैसर्गिक जरी मानले, तरीही तो टप्पा किंव्हा परिस्थिती ओलांडावी लागण्याची गरज निर्माण व्हायला लागते. असे वाटायला हवे कधीतरी, की हेतूची गरज शांतीसाठी खरी नसते. 

म्हणजेच शांती स्वतः सिद्ध असते. परिस्थितीची बडबड करत राहणे, हे कितपत योग्य असते, ते ओळखावे.

हरि ओम.

Saturday, 16 May 2026

श्री

 श्री 


स्वतःच्या अस्तित्वाला कारण लागत नाही. No justification required. अस्तित्व असतेच, त्यातून निर्मिती होते, संबंध होतात, स्मरण होते, चक्र होते, व्यवहार होत राहतात, आपण होतो, आणि परिवर्तित होतो सर्व स्थितीत. एखादी _गोष्ट_ अशी का होते, अशी का आली, अशी का बदलत राहील, ह्याने का चिंतीत व्हावे?! दृश्याचा स्वभाव "बदल" आहे, आणि दृश्याचा मूळ संबंध भगवंताशी आहे, म्हणून अस्तित्वात _पसरण आणि खोल_ अशा दोन्ही गोष्टी आढळून येत राहतात. ह्या सर्वातून _प्रवास_ असतो स्वतःचा.  विचारांच्या धारा आणि चक्र दररोजची गोष्ट आहे. त्याकडे बघण्याची कला साधली हवी. 

स्वतःला काय वाटतं, ही बाब स्वतः सिद्ध आहे आणि त्यासाठी खरे पाहिले तर स्पष्टीकरणेची जरुरी नसते. आपण हेतू लावतो विचारातून आणि परिणाम भोगतो आणि त्यात गुंतून राहतो - हा दिव्य भाव जाणवायला हवा. दृश्याचे _संस्कार_ मनात आणल्यामुळे तात्पुरतेपण, अहं भाव, स्मरण, गुंतागुंती, धावपळ, भीती, अशा भावना प्रस्थापित केल्या जातात, ज्याच्याशी आपण आसक्ती धरतो. 

Dnyanatun जर हेतूच बळावला, तर ते व्यर्थ ठरू शकतं. काही मिळवण्यासाठी, काम करण्यासाठी, जगण्यासाठी, "हेतू" कसा असावा, ह्याकडे लक्ष द्यावे. आणि तरीही भगवंताला सर्व अर्पण करत राहावे.

हरि ओम.

Tuesday, 12 May 2026

श्री

 श्री 

 अस्तित्वाचे अनेक छटा आहेत. सबंध अपरिहार्य असतात. आपण विघटित होऊनदृश्यात जन्म घेतो आणि संबंधित राहतो किंव्हा _बंधनात वावरतो_. बुद्धीच्या भाषेत बंधनातून मोकळे होणे म्हणजे खूप जर आणि तरह्या भाषेत विषय मांडणेसुरुवात शोधत राहणेसाखळी समजून घेणेअर्थ लावणेदोष शोधणेकोडी सोडवणेअट्टाहास ठेवणेवगैरेअसे होते. विवेकाने बघायला हवे की ह्याच स्वभावाचा उपयोग कसा होतो आणि कुठे कष्ट होतात. थोडक्यात शांत होण्यासाठी बऱ्याच प्रकारे बुद्धीचा (किंव्हा रूपाचा)  वापर करायला लागतो. त्याला गुढत्व म्हणावेजे एकाच पद्धतीनेसरळ रेष प्रमाणे नसणारही आहे. In that sense, nothing can be predicted beforehand and everything is 'alive' as an engagement. Therefore, everything is situated in "now". 

 It means that the past and the future (as projections of _set_ patterns of the mind) ought *not* to create any disturbance in the present moment, because they _needn't be logically linked_ through any set pattern. 

 म्हणजेच पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टींचा परिणाम किंव्हा उद्या येऊ पाहणाऱ्या गोष्टींची काळजी आपल्याला त्रस्त का करावीत्या अर्थाने आपण कशानेही ठरत नसतो...आपण मोकळे असतो प्रत्येक क्षणात. त्या अर्थाने, "मोकळे" म्हणजे आत्ताच्या क्षणी जगणे आणि कर्तव्य करणेभगवंताला सर्व अर्पण करणे. भगवंत म्हणजे "आत्ताचा क्षण". 

 इथे असे उल्लेख असतो मार्गावर जात राहतानाकी भगवंताचे चिंतन आपलं लक्ष क्षणात स्थित करतात आणि त्यामुळे पूर्वीच्या गोष्टींचे वजन किंव्हा उद्याच्या गोष्टींचा प्रभाव क्षीण व्हायला मदत होते. 

 दुसऱ्या शब्दात म्हटलं तर गोष्टींचे होणेवावरणे,गतिमान असणेगुण असणे - हे भगवत इच्छेने असते असे आपल्याला ओळखता आले पाहिजे. म्हणजेच सर्व भगवंताला अर्पण करणे आणि आपण मोकळे व्हावे.

 हरि ओम

 

 श्री 

 प्रवाहात स्थिरता स्थित करायला लागते. स्थिरता हा भाव आहेप्रवाहात प्रस्थापित होणारा. स्थिरतेमुळे प्रवाह थांबत नाहीपण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. 

 प्रत्येक क्षणात बदलतात्पुरतेपणवेगळेपणवृत्तीचक्रभावस्मरण - असे सामावलेले दिसते. आता ह्याला काय दोष म्हणावा का?!! ह्या सर्व गोष्टींना स्वीकारून शांतीचा संबंध प्रस्थापित होणे हिताचे ठरते स्वतःला. 

 वरील हालचालींमुळे बहुतांश निर्मिती "मर्यादा", "चौकट", "अहं भाव" ह्याची होते आणि त्यामुळे स्वार्थी संबंध प्रस्थापित होऊ पाहतात. त्यामुळे व्यवहारतुझेमाझेतात्पुरतेपणवेगळेपणममत्वस्थळकाळआयुष्यजन्ममरणअश्या संकल्पनेत किंव्हा अनुभवात गुंतायला होते.  _Pattern_ of living the existence. 

 ही सुरुवात ओळखूनशांतीकडे प्रस्थान होणे आहे. म्हणजेच सूक्ष्म स्तर किंव्हा सत्यात. म्हणजेच कुठल्याही हालचालींचे परिणाम न रुजू देणे. ह्यावरील उपाय अनेक असावेत बुद्धीतून आलेलेभावनेतून आलेलेकामातून आलेले. ज्योतिषशास्त्रात म्हणे अगोदरच असे २४ patterns नमूद केलेले आढळतातकी त्यात जीव कसा गुंतला जाणार असतोह्याचा अभ्यास! म्हणजे हे सर्व कळू शकते जीवाला! 

 तरीही त्याची चिकित्सा न करताआपल्या हातात भगवंताचे चिंतनअसे रसायन आहे. त्यावर लक्ष केंद्रित करूनते करायला लागावे. योग्य परिणाम होत राहील.

 हरि पाठ किंव्हा प्रवचनअशा थोर लिखाणात "सुरुवात" अनुभवातून कसे होऊ द्यावे आणि कसे प्रश्न येत राहतीलअसा काहीसा साचा आढळून येतो. म्हणून ज्योतिषशास्त्रातील किंव्हा उपनिषद्धातील patterns समजून घेण्याची तसदी न घेता आणि शक्ती खर्च न करतासर्वात मूळ आणि सोप्पा उपाय म्हणजे नाम घेत रहावे श्रद्धेने. त्यातून परिणाम निश्चित योग्य होत राहीलअसे सुचविले आहे.

 हरि ओम.

 

 श्री 

 स्वतःच्या आतशंका दडलेली आहे. ती स्वीकारायला हवीकी शंका असून देखीलजे काही त्यातून जाणिवेत येत राहीलत्याने स्वतःला लेखू नये आणि शांत रहावे. शंका जाईल किंव्हा परिवर्तित होईलतेव्हा होईल...त्या बद्दलही विचार चक्र प्रस्थापित होण्याची गरज नसावी. शंकेचे प्रयोजन असेलच अस्तित्वातम्हणून ती ध्यानी येत राहते. 

 ह्या मार्गावरून जायचे आहे मलातर तसे होणे आहे. त्यात येऊ पाहणारे संबंधहालचालीपरिस्थितीकामाचे स्वरूपदेणे देऊ लागणे - सर्व स्वीकारणे माझ्या हिताचे ठरेल. स्वीकारण्याची क्रिया रूपातून स्थित होत राहीलत्यालाही इतरांना स्पष्टीकरण देण्याची जरूरी नसते. ज्यांना कळतेत्यांना कळते. ज्यांना कळून घेण्याची इच्छा नसतेत्यांची जबाबदारी आपली नसतेमग तश्या व्यक्ती नात्यातली असो किंवा दूरचे कुणीतरी. 

 मार्ग आहे. तो घेणे आहे. आणि भगवंताचे चिंतन ठेवणे आहे.

 हरि ओम.

 

 श्री 

 इतके विचार ध्यानी का येत राहतातह्या रूपात का,  ह्या पद्धतीने काइतक्या प्रमाणात किंव्हा वेगात का - ह्याचे उत्तर भगवंताकडे आहे. विचार प्रस्थापित होणे आणि त्यातून खूप सारे संबंध होणेस्मरण होणेचक्र होणे - हे त्याचे कार्य आहेम्हणून ते होऊ देणे शांतीने. जर सर्व त्याची इच्छा आहेतर विचारातून जाणवणारे अर्थहालचाली...त्याच्याच इच्छेने होत असलेल्या हवे! *त्याची इच्छा* - असा भाव आपल्या आत संक्रांत व्हायला हवा. त्यासाठी विचारांची धारा सुरू राहत असताना भगवंताचे चिंतन करत राहावे.

 हरि ओम.

 

 श्री 

 मला असं वाटतं की सर्व भगवंत करतो. आपण एक निमित्त असतोसूक्ष्मातून येणारे आणि तसेच निघून जाणारे. येणे आणि निघून जाणेह्यात हेतू असावा का?!! हा महत्वाचा प्रश्न आहे जीवालाआणि ह्या आकारात पदार्पण करून तो प्रश्न निर्माण होणार. उत्तर आहे - माहीत नाही. पण ह्याने भांबावून जाण्याची गरज नाही. उत्तर माहीत नाहीह्यातच "शोध" हा प्रकार प्रस्थापित होतो. त्याला वेळ द्यावे. उपद्व्याप करूनव्याकुळ होऊन काय हाथी मिळते काह्याचा विचार करावा. सर्व योग्य वेळी योग्य गोष्टी होतील. आपण शांत रहावे आणि भगवंताचे चिंतन करावे.

 चिंतन दररोज व्हायला हवेकारण त्यातून संबंध स्वच्छ होत राहतात. धूळ साफ करण्यासारखे आहे. मन दररोज विचारातून काहीतरी निर्माण करत राहतेकुठेतरी गुंतत राहतेकाहीतरी अपेक्षा ठेवतेव्याकुळ होतेधडपड करतेपरिणाम भोगत राहतेचक्रात वावरत राहते. अशा वेळी नामस्मरण करण्याचा योग मनाने हाथी घ्यावा. 

 हरि ओम.

 


Friday, 8 May 2026

श्री

 

श्री 

 

शांत होत राहणे. एकटेपणाचे विशेष काहीही नसते... तो भ्रम असतो दृश्यात गुंतलो तर जाणवणारा. सर्व ठिकाणी भगवंताचे कार्य असते. त्याचे स्मरण आत्मसात होऊ देणे अंतःकरणात. म्हणजे अस्तित्व भाव काय आहे, हे जाणवायला हवे...त्यात स्थित व्हायला हवे. 

 

आयुष्यात हालचाली, बदल, संबंध अनुभवात राहणार असतात. त्याला प्रतिक्रिया द्यावी का, हे ओळखावे. कुठेही जरी मी शांत बसलो आणि काहीही बोललो नाही, तरीही ध्यानात भगवंताचे स्मरण सतत सुरू राहायला हवे. स्मरण हे कार्य आहे, ती फक्त आठवण नाही. किंबहुना आठवणीला शुद्ध कार्याचे स्वरूप आले, की भगवंताचे चिंतन होते, असे ओळखावे. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

सर्व गोष्टी होतात. आपण काही करत नसतो. गोष्टी होण्याची शक्ती किंव्हा कार्य भगवंताकडे असते, ज्याच्यामुळे आपल्याकडून एक स्मरण किंव्हा रूप धारण केलं जातं. हे सर्व आपोआप होते आणि होत राहते. सर्व प्रकार वर्तमान काळात स्थित झालेला ओळखावा. Only is. पूर्वीच्या गोष्टींचा अर्थ, साखळी, आत्ताचे विषय, उद्याचे अर्थ - ही _कल्पना_ निर्माण होते. बदल, संबंध देखील _कल्पना_ आहे, जी कार्यातून निर्माण होते. कल्पना इथे perception, ह्या अर्थाने अधिक संबोधले आहे. कारण त्यातूनच निश्चय केला जातो, परिणाम होतो, भोग सामोरे जायला लागतात, चक्र वावरत राहतं, वगैरे. 

 

ध्यानी संपूर्ण स्तर आत्मसात व्हायला हवे - स्थुलातून सुरुवात करून सूक्ष्म प्रकृती पर्यंत....तरच दृश्यात होणाऱ्या घडामोडींची बाधा कमी होते. कल्पना सध्याची इतकी जबरदस्त आहे, की त्यातून स्मरण, भाव, संबंध, बदल अशा गोष्टी सतत ध्यानी येत राहतात आणि काहीतरी खटपट करायला भाग पाडतात. 

 

कल्पनेचे मूळ स्वरूप काय असते, हे ओळखण्यासाठी नामाचा पाठ करत राहावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

मी विचारातून सिद्ध होत नसतो, किंबहुना तसा हेतू ठेवू नये इतरांसाठी. रूपातून "मी" आहे, अशी समजूत होते. खरे पाहिले तर फक्त अस्तित्व भाव आहे, जे स्वतः सिद्ध असते, ज्याला दृश्यांची उपाधी लागत नाही. किंव्हा दृश्याच्या भाषेतून त्याला समजून घेता येत नाही. 

 

परिस्थितीचे रूप गूढ असते, ज्याला फक्त भगवंताची इच्छा कारणीभूत असते, म्हणून मी काय, स्वतःला वाटणे काय, व्यवहार काय - संपूर्ण संकल्पना आहेत, सत्य नाही. शंका त्यामुळे असणे योग्य आहे, कारण स्वतःच्या मूल्यांना आपण घट्ट धरून ठेवत नाहीत. अपुरेपण किंव्हा तात्पुरतेपण वाटणे महत्वाचे आहे, कारण त्यातूनच मार्ग निवडला जातो आणि स्थिरता प्रस्थापित होते. 

 

दृश्यात _प्रवास_ लिहिलेला आहे, अनुभव ध्यानात येतील, प्रवाह असेल, संबंध असतील, भोग येतील, स्मरण असेल...प्रवास कसा असेल, ह्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावे. सगळे उत्तरे त्या क्षणात माहित नसतात आणि बुद्धीने सगळी उत्तरे माहीत झाली तरी "समाधान" त्यात साठवलेला नसतो! तात्पर्य, बुद्धीने गोळा बेरीज करा, रेष आखा, पहिले काय ह्याचा मागे लागा, शेवट कुठे होणार ह्याचा विचार करा, कोडी सोडवा, स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करा - *तरीही* समाधानाची भाषा वेगळी असते, आणि ती म्हणजे शांत होऊ पाहणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

सर्व विचार एकमेकात _संबंधित_ असतात किंव्हा होतात. त्यात सुरुवात कुठे आणि शेवट कुठे असे समजून घेणे कष्टी करते स्वतःला. म्हणून, आपण जिथे कुठे आहोत, त्याला प्रवास मानून शांत होण्याचे चिंतन सुरू करावे. असलेला क्षण, ह्याला "सुरुवात" मानावे आणि शेवट म्हणजे भगवंत भावात स्थिरावणे.

 

बुद्धीच्या मार्गातून सुरुवात शोधणे, एका प्रकारे व्यर्थ असते किंव्हा त्यातून दमायला होते. हे ओळखल्यावर, बुद्धी सर्व निर्मिती स्वीकारायला लागते, श्रद्धा वाढायला लागते, भोग स्वीकारले जाते आणि शांती रस आत्मसात होते. 

 

हे सरळ तत्वद्न्यान आहे, जीवाच्या स्वभावाशी निगडित करताना, दृश्याचा अर्थ समजून घेताना आणि सत्याचे अस्तित्व मानून घेताना आणि संबंधांची जागा ओळखताना, ज्यावरून मार्ग पत्करावा लागतो कधी ना कधीतरी.  

 

मूळ प्रश्न अस्तित्वात वावरताना असा प्रकट व्हायला लागतो की - "आपण" म्हणजे कोण?! हा काय प्रकार असतो? "इथे" कुठून येतो, काय करतो, का करतो, कुठे जातो?! कार्य म्हणजे काय? विचार आणि भावना म्हणजे काय? त्यावरून दृश्याशी संबंध कसे स्थित होतात आणि _का_? ह्या प्रश्नातून आपण "जागे" व्हायला लागतो झोपेतून (किंव्हा विस्मरणातून) आणि शांतीचा मार्ग प्रस्थापित व्हायला लागतो. हा प्रवास सोप्पा नाही तसा, तरी ह्याला पर्याय नाही. 

 

रूप निर्माण करणे आणि त्यात आपला जीवाचा भाव प्रस्थापित करणे, हा खेळ भगवंताची शक्ती करत राहते. जे रूप घेऊ, त्याचे संस्कार किंव्हा स्वभाव आपण धारण करतो (वासना धारण करते). त्यातून संबंध आतील घडामोडींशी आणि इतर निर्माण झालेल्या रुपाशी होत राहतात. आणि ह्या चक्रात वावरणे स्थित होते. त्यावरून येणारी परिस्थिती आणि भोग. 

 

असो...असे अनुभवात येणे आहे. प्रवास होणे आहे. प्रवाहात राहणे आहे. देणे आहे. त्या अनुश्रुंगाने, चिंतन होणे आहे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

दुसऱ्यांच्या वासना शांत करण्याचा ठेका आपण घेत नसतो, आणि तो स्वतःच्या बुद्धीतून हे कोड सुटणे कठीण. इतरांच्या वासना शांत नाही झाल्या तरी त्यातून स्वतःला लेखण्याची गरज नाही, किंव्हा ती स्वतःची जबाबदारी असते, असेही म्हणून घेण्याची गरज नाही. 

 

म्हणजे थोडक्यात स्वतःची वासना इतर वासनांशी संबंधित राहण्याची/ ठेवण्याची गरज नाही/ परावलंबित राहण्याची गरज नाही. संबंध हा गूढ भाव आहे, तो फक्त बौद्धिक नाही. खूप साऱ्या स्तरातून "संबंध" प्रस्थापित होतात "इतर रूपांशी". 

 

म्हणून त्रासेचे मूळ खूप खोलवर असते, गूढ असते आणि स्वतःच्या मनाशी निगडित असते. ह्याचा अर्थ हा, की सर्व प्रश्नांचे उत्तरे स्वतःला शुद्ध होण्यात सामावलेले असतात...इथे दुसरा कुणी काहीही करणे अवघड. 

 

वरील सत्य विधान पचवायला खूप वेळ किंव्हा प्रयास लागू शकतो. त्यासाठी हा प्रवास दिलेला असतो, हे अनुभव येऊ पाहतात, वगैरे. त्याला काही करायचे असते, असे नाही. ते येऊ द्यावे आणि जाऊ द्यावे. येणे आणि जाणे, ह्यावरून वासनांचे नियंत्रण किंव्हा हेतू किंव्हा सिद्धत्व ठरवू नये. 

 

दुसऱ्या भाषेत हे सांगायचे आहे की मनाचा स्वभाव सतत कुठल्यातरी निर्मितीत, हालचालीत, गोष्टीत गुंतून राहण्याचे बघतो, विषय मांडतो, हेतू धरून ठेवतो, अहं वृत्ती बाळगतो, एखाद्या स्मरणेला पकडून ठेवतो, कसल्यातरी बिंदूत गुंतून स्वतःची सार्थकता मानतो. 

 

ह्याच स्वभावात शांतीचे संस्कार स्थित होऊ द्यावे लागतात. 

 

हरि ओम

 

 

श्री 

 

देह, भावना, बुद्धी, वासना - ह्यांना धरणे, म्हणजे तेच ते चक्र ध्यानात वावरत राहणे आणि त्यातून स्मरण होणे अस्तित्वाचे. ह्या चक्रात सुरुवात, शेवट, पहिले, नंतर, गुंता - ह्याचे काहीच स्पष्टीकरण होत नाही. म्हणजे सर्व विश्लेषणच मानायला हवे, की *अस्तित्व असल्यामुळे*, हे _चक्र प्रत्ययास येऊ पाहते_ आणि ध्यानात येते आणि मन करते आणि परिणाम देते. 

 

चक्र अनेक स्तरात असते आणि त्याच्या कार्यामुळे स्मरणांचा अर्थ प्रस्थापित होतो. त्यात कुठेतरी आपली ज्याची जाणीव प्रस्थापित होते आणि त्या चक्राला आपण "प्रपंच" म्हणून ओळखतो!...

 

तरीही प्रपंचाची जाणीव आणि उगम सूक्ष्म प्रकृतीतीशी संबंधित असतो, म्हणून प्रपंचात सर्व स्तराचे स्थान असते आणि ते सर्व स्थान सध्याच्या प्रपंचाचे स्वरूप ध्यानी आणत राहते. 

 

म्हणून मन दृश्यात सत्यात पदार्पण करू शकते. त्याला "मार्ग" म्हणावा.

 

एकंदरीत मन कशालाही धरू शकते आणि काहीही निर्माण करू शकते.  हे विसरू नये. त्यातून अस्तित्व स्पष्ट अनुभवात येऊ पाहते.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही गोष्टींचे कारण, की आपण असे का करतो, आणि असे विचार का येऊ पाहतात, हे कळत नसते...पण काहीही हरकत नसावी. विचार आणि भावना, ह्यांचे स्थान भगवंताची शक्ती ठरवते, म्हणून त्यांची निर्मिती, वावर, बदल, संबंध, कार्य, हे राहणारच. ह्यालाच श्रद्धा म्हणायची. की सर्व जे काही घडामोडी होऊ पाहतात किंव्हा जाणवत राहतात, ते भगवंताच्या इच्छेमुळे रूप आणि आकार घेतात, बदलत राहतात आणि विलीन होतात. 

 

म्हणून शांत वाटून घेण्यासाठी आपण एखादी जागा, वेळ, वस्तू, विचार, भावना, व्यक्ती शोधतो. त्या वस्तूत शांती नसून, तो प्रसंग आपल्याला शांत करतो, म्हणून त्याकडे आपण ओढले जातो. 

 

खरी शांतता अर्थात आत डोकावून स्थित व्हायला हवी, मग कशाचीही जरूरी नसते. तरीही, ते साध्य होण्यासाठी सगुण शांततेचे स्मरण ठेवावे आणि तसे संस्कार मनाला देत राहावे. सगुण परावलंबिक, रूप, आकार घेऊन असते. म्हणून एखादा चांगला गुण जर स्थित व्हायचा असेल, तर सगुणात ओळखून, त्याचे चिंतन करून, निर्गुणात प्रवेश करायला लागते. निर्गुण म्हणजे स्थळ आणि काळाच्या चौकटीच्या पलीकडे होणे.

 

त्या अर्थाने नामस्मरण सगुण स्मरण मानावे भगवंताचे. ते अखंड करत गेल्यामुळे मनाला निर्गुणाचे स्वरूप येते.

 

हरि ओम.