श्री
काही विचार...
विचार आले जरी नाही, तरी कार्य सुरू असतेच, परिणाम होत असतोच.
म्हणून विचार येऊ द्यायचे नाही मनात, असे करण्यापेक्षा,
विचार "प्रकट" होण्याची इच्छा शांत होऊ देणे जास्ती हितकारक आहे.
तशी जाणीव किंव्हा भाव होणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी
समाधानी भाव आत्मसात होणे आले. म्हणजे आपण सूक्ष्म स्थिती बद्दल बोलत आहोत इथे.
समाधान दृश्यात का नसते? हा प्रश्न
महत्त्वाचा आहे. दृश्याचा अनुभव अनेक स्तरांच्या क्रियेतून किंव्हा कार्यातून होते
आणि त्या प्रमाणे दृश्याचा स्वभाव प्रकट होतो. आपणही दृश्यात होतो,
म्हणून दृश्याचे गुण धर्म आपल्यातही प्रकट होतात आणि त्यामुळे
"गुंतणे" ही क्रिया होते आणि "परिणाम भोगणे" हे देखील त्यातून
घडते. सारांश, आपला स्वभाव _अस्थिर_
राहतो. _आकार_, ही स्थिती सतत बदलणारी आहे,
उगवणारी, वाढणारी आणि झीज होणारी. त्यावर मन गुंतले की तसेच
गुण आपण धारण करतो - म्हणजे काळजी, त्रास,
कष्ट, भीती, खंत वगैरे. देह
बदलणार, हे अटळ आहे. मन अस्थिर का ठेवावे?!!
जे जाणार त्याला थांबवण्यात काय अर्थ आहे किंव्हा अट्टाहास ठेवावा?!
हे मनाने ओळखायचे असते. ते आत्मसात केल्यावर मन स्थिर होते,
शांत होते. हे होण्यासाठी नामाच्या शक्तीचे चिंतन करावे.
एक स्वभाव धारण केल्यामुळे आपली विचारांची साखळी होते,
शब्द त्या प्रमाणे ऐकले जातात, प्रतिक्रिया त्या
प्रमाणे दिली जाते, हेतू त्या प्रमाणे ठेवला जातो,
परिणाम त्या प्रमाणे सामोरे येत राहतात, स्मरण त्या प्रमाणे
प्रज्वलित राहते. तात्पर्य हे, की ह्या प्रक्रियेत
साहजिकच तात्पुरतेपण भावना वाट्याला येते. त्यात आपण आणखीनच चक्रात गुंतत राहतो
आणि त्या गोष्टीशी किंव्हा कल्पनेशी एकरस होतो. दुसऱ्या भाषेत ह्याला संस्कार
म्हणतात किंव्हा "संगत होणे".
ह्यातील मर्म हे, की संगत खूप खोल वरून आलेली असते. त्यामुळे कुणाशी
बोलावे, किंव्हा न बोलावे, कधी बोलावे,
का बोलावे, काय बोलावे, कसे ऐकावे,
कधी प्रतिक्रिया मांडावे, कशी मांडावे ह्या
गोष्टी निर्भर असतात. म्हणून प्रत्येकाची ऐकण्याची, बोलण्याची,
सांगण्याची पद्धत वेगळी असते आणि त्यावरून आपली संगत तशी असावी की नाही
किंव्हा प्रतिक्रिया ठरवावी की नाही हे पूर्णपणे स्वातंत्र्य असते प्रत्येकाला. हे
ओळखणे खूप गूढ कार्य आहे. त्याचा अभ्यास करावा लागतो.
तिसरी गोष्ट ही की विचार येऊ द्यावे आणि जाऊ द्यावे. त्यात गुंतण्याची गरज
नसते...इतके की गुंतू की नको असाही विचार उमटता कामा नये! अशी मनोभावना झाली,
तर विचारांचे रूपांतर कर्मात आणि हालचालीत आणि परिमाणात होत नाही. म्हणजे
शांती भाव कायम राहते.
विचार यायलाच हवे आणि त्यातून सिद्ध व्हायला हवे - अशी भूमिका आपल्याला अशांत
ठेवते. त्या भूमिकेला काहीही अंत नाही आणि त्यातून अधिकाधिक विघटित अनुभव पदरी येत
राहतात. विघटन म्हणाल तर त्या बरोबर असंख्य भावना आणि बेफिकीर वागणूक. त्यात मग
वेग, खूप अट्टाहास, उर्मठपणा,
आगाऊ वागणूक, दुसऱ्यांना हिडीस फिडीस करत राहणे,
खूप बडबड करत राहणे, खूप आवाज करत राहणे, खूप वैतागणे,
खूप चिंतेत राहणे असा "रोग" स्वतःला पछाडतो.
इथे आपण भोग संकल्पना मांडूया आता. वरील विवेक बुद्धी वापरत असताना देखील काही
गोष्टी दुःख भाव निर्माण करतील आणि मनाला व्याकुळ करतील. हे अपरिहार्य आहे. त्यात
सैय्यम ठेवून कार्य करत राहावे, भगवंताचे चिंतन
करावे आणि काहीही झालं तरी शांती भाव सोडू नये. दुःख देणे हे दृश्याचा स्वभावामुळे
होणार, त्यात गुंतावे की नाही, हे आपल्या मनाच्या
शक्तीवर निर्भर आहे.
हरि ओम.
Shree
Revelation...
Noone can force anyone's emotions and how those have
formed _onto us_ so as to manage those for the people who vent out those. We
can't change people and our responsibility isn't that nor are we required to
despise ourselves for being quite aloof on those matters.
We can empathize with such changes and mysterious
journeys of emotions, not trying to label or judge them...but that doesn't mean
we shouldn't deserve respect.
Therefore a need for healing is essential for all of us.
I forgive my own emotional journeys and how they seem to interact with the
world at large, which may not be proper but I haven't a clue where it requires
improvement.
I choose to heal and forgive myself, so all relationships
are healed and what gets created is only love and peace.
I choose to heal myself for things that couldn't be
controlled, for some errors caused perhaps, for some decisions that may have
played havoc on others. None of it was intentional, but nevertheless I seem to
have internalised the imagined hurt. So I choose to _release_ all hurts.
I choose to be free. I choose to just let things be
without anything of colouring because of self imposed judgments.
Hari Om.
No comments:
Post a Comment