Saturday, 4 April 2026

श्री

श्री 

आधार भगवंत कार्याचा असावा नेहमी, म्हणजे अंतर्मुख अनुभव स्थित करावे. आपण दृश्याचा, भितीचा आधार घेतो, म्हणून तसे परिणाम होत राहतात आणि संबंध जोडले जातात. आपली हाव काही सुटत नाही, ह्याचे कारण म्हणजे भीती. ती हाव शिथील होण्यासाठी शांती भाव आतून प्रकट व्हायला हवे. 

कार्य खूप सूक्ष्म स्तरातून होत असते आणि आपण कितीही विचारातून बांध करायचा ठरवला, तरी ते कसेही आरपार आत येते आणि विचार चक्र फिरवते! ह्याचा अर्थ हा, की विचारही सूक्ष्म स्तरातून होत राहतात, आपणही. म्हणून सर्व घडामोडींची चालना भगवंत देतो, हे ओळखावे आणि शांतीने स्वीकारावे. 

होणे, वावरणे, बदलणे, संबंधित येणे, प्रवाहात राहणे, निघून जाणे - हे म्हणजे *कार्य*. ते होत राहणार आणि निरनिराळे रूप आणि आकार निदर्शनास येणार. ते होणारच. म्हणून शुद्ध आणि शांती भावनेतून सर्व बघावे आणि कार्य करावे. कार्य म्हणजेच शांती भाव स्थित होऊ देणे आणि त्याला कसलीही अट लावू नये.

हरि ओम.

No comments:

Post a Comment