श्री
शक्ती म्हणजे भाव आणि त्याचा परिणाम, कार्य, क्रिया, स्तर, चक्र आणि आकार. त्या सर्व क्रियांमध्ये "मी" भाव जन्म घेतो आणि बरेच प्रश्न, शोध, अनुभव, संबंध घेऊन येतो किंव्हा निर्माण करत राहतो. काय दिसते आणि काय नाही; किंव्हा काय आत्ता, काय मागे, काय पुढे - हे सर्व गोष्टी साखळी नमूद करते. गोष्टींच्या हालचाली खूप सुक्षमापसून ते स्थुला पर्यंत होत राहतात म्हणून संबंध खूप गूढ असतात आणि ते जन्मो जन्मी चालून आलेले असतात. म्हणून गोष्टींचे घडामोडी किंव्हा अनुभवांचे होणे, कार्य, परिणाम वगैरे खूप, खूप, खोल पातळीपासून घडतं असतात. कुठेतरी वरच्या पातळीवर बुद्धी काम करते म्हणून बुद्धीची मर्यादा असते किंबहुना दृश्य जग भासण्याची मर्यादा असते. पण त्याचा परिणाम आणि उत्पत्ती खूप खोलवर असते. म्हणून शांत होत जाणे हा मार्ग अंतर्मुख होण्याचा आहे.
आपल्याला कळणार नाही इतकं भगवंताला अगोदरच ठाऊक असतं कारण त्याच्या असण्यामुळे आपण होतो आणि व्यवहारात राहतो. गोष्टींचे होणे, वावरणे, जाणे हे सर्वस्वी त्याच्या मुळे होत राहतात. त्या क्रियेला आपण पूर्ण स्वीकारलेले नसल्यामुळे आपण अभिमान भाव बाळगतो. म्हणजे तोच भाव आणि अनुभव पदरी आणतो!
अजिबात काळजी नसावी. पूर्ण श्रद्धा वाढवा - त्यातून पूर्ण सुख लिहिले आहे!
हरि ओम.
No comments:
Post a Comment