श्री
अस्तित्वाचे अनेक छटा आहेत. सबंध अपरिहार्य असतात. आपण विघटित होऊन, दृश्यात जन्म घेतो आणि संबंधित राहतो किंव्हा _बंधनात वावरतो_. बुद्धीच्या भाषेत बंधनातून मोकळे होणे म्हणजे खूप जर आणि तर, ह्या भाषेत विषय मांडणे, सुरुवात शोधत राहणे, साखळी समजून घेणे, अर्थ लावणे, दोष शोधणे, कोडी सोडवणे, अट्टाहास ठेवणे, वगैरे, असे होते. विवेकाने बघायला हवे की ह्याच स्वभावाचा उपयोग कसा होतो आणि कुठे कष्ट होतात. थोडक्यात शांत होण्यासाठी बऱ्याच प्रकारे बुद्धीचा (किंव्हा रूपाचा) वापर करायला लागतो. त्याला गुढत्व म्हणावे, जे एकाच पद्धतीने, सरळ रेष प्रमाणे नसणारही आहे. In that sense, nothing can be predicted beforehand and everything is 'alive' as an engagement. Therefore, everything is situated in "now".
It means that the past and the future (as projections of _set_ patterns of the mind) ought *not* to create any disturbance in the present moment, because they _needn't be logically linked_ through any set pattern.
म्हणजेच पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टींचा परिणाम किंव्हा उद्या येऊ पाहणाऱ्या गोष्टींची काळजी आपल्याला त्रस्त का करावी? त्या अर्थाने आपण कशानेही ठरत नसतो...आपण मोकळे असतो प्रत्येक क्षणात. त्या अर्थाने, "मोकळे" म्हणजे आत्ताच्या क्षणी जगणे आणि कर्तव्य करणे, भगवंताला सर्व अर्पण करणे. भगवंत म्हणजे "आत्ताचा क्षण".
इथे असे उल्लेख असतो मार्गावर जात राहताना, की भगवंताचे चिंतन आपलं लक्ष क्षणात स्थित करतात आणि त्यामुळे पूर्वीच्या गोष्टींचे वजन किंव्हा उद्याच्या गोष्टींचा प्रभाव क्षीण व्हायला मदत होते.
दुसऱ्या शब्दात म्हटलं तर गोष्टींचे होणे, वावरणे,गतिमान असणे, गुण असणे - हे भगवत इच्छेने असते असे आपल्याला ओळखता आले पाहिजे. म्हणजेच सर्व भगवंताला अर्पण करणे आणि आपण मोकळे व्हावे.
हरि ओम
श्री
प्रवाहात स्थिरता स्थित करायला लागते. स्थिरता हा भाव आहे, प्रवाहात प्रस्थापित होणारा. स्थिरतेमुळे प्रवाह थांबत नाही, पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.
प्रत्येक क्षणात बदल, तात्पुरतेपण, वेगळेपण, वृत्ती, चक्र, भाव, स्मरण - असे सामावलेले दिसते. आता ह्याला काय दोष म्हणावा का?!! ह्या सर्व गोष्टींना स्वीकारून शांतीचा संबंध प्रस्थापित होणे हिताचे ठरते स्वतःला.
वरील हालचालींमुळे बहुतांश निर्मिती "मर्यादा", "चौकट", "अहं भाव" ह्याची होते आणि त्यामुळे स्वार्थी संबंध प्रस्थापित होऊ पाहतात. त्यामुळे व्यवहार, तुझे, माझे, तात्पुरतेपण, वेगळेपण, ममत्व, स्थळ, काळ, आयुष्य, जन्म, मरण, अश्या संकल्पनेत किंव्हा अनुभवात गुंतायला होते. _Pattern_ of living the existence.
ही सुरुवात ओळखून, शांतीकडे प्रस्थान होणे आहे. म्हणजेच सूक्ष्म स्तर किंव्हा सत्यात. म्हणजेच कुठल्याही हालचालींचे परिणाम न रुजू देणे. ह्यावरील उपाय अनेक असावेत बुद्धीतून आलेले, भावनेतून आलेले, कामातून आलेले. ज्योतिषशास्त्रात म्हणे अगोदरच असे २४ patterns नमूद केलेले आढळतात, की त्यात जीव कसा गुंतला जाणार असतो, ह्याचा अभ्यास! म्हणजे हे सर्व कळू शकते जीवाला!
तरीही त्याची चिकित्सा न करता, आपल्या हातात भगवंताचे चिंतन, असे रसायन आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून, ते करायला लागावे. योग्य परिणाम होत राहील.
हरि पाठ किंव्हा प्रवचन, अशा थोर लिखाणात "सुरुवात" अनुभवातून कसे होऊ द्यावे आणि कसे प्रश्न येत राहतील, असा काहीसा साचा आढळून येतो. म्हणून ज्योतिषशास्त्रातील किंव्हा उपनिषद्धातील patterns समजून घेण्याची तसदी न घेता आणि शक्ती खर्च न करता, सर्वात मूळ आणि सोप्पा उपाय म्हणजे नाम घेत रहावे श्रद्धेने. त्यातून परिणाम निश्चित योग्य होत राहील, असे सुचविले आहे.
हरि ओम.
श्री
स्वतःच्या आत, शंका दडलेली आहे. ती स्वीकारायला हवी, की शंका असून देखील, जे काही त्यातून जाणिवेत येत राहील, त्याने स्वतःला लेखू नये आणि शांत रहावे. शंका जाईल किंव्हा परिवर्तित होईल, तेव्हा होईल...त्या बद्दलही विचार चक्र प्रस्थापित होण्याची गरज नसावी. शंकेचे प्रयोजन असेलच अस्तित्वात, म्हणून ती ध्यानी येत राहते.
ह्या मार्गावरून जायचे आहे मला, तर तसे होणे आहे. त्यात येऊ पाहणारे संबंध, हालचाली, परिस्थिती, कामाचे स्वरूप, देणे देऊ लागणे - सर्व स्वीकारणे माझ्या हिताचे ठरेल. स्वीकारण्याची क्रिया रूपातून स्थित होत राहील, त्यालाही इतरांना स्पष्टीकरण देण्याची जरूरी नसते. ज्यांना कळते, त्यांना कळते. ज्यांना कळून घेण्याची इच्छा नसते, त्यांची जबाबदारी आपली नसते, मग तश्या व्यक्ती नात्यातली असो किंवा दूरचे कुणीतरी.
मार्ग आहे. तो घेणे आहे. आणि भगवंताचे चिंतन ठेवणे आहे.
हरि ओम.
श्री
इतके विचार ध्यानी का येत राहतात, ह्या रूपात का, ह्या पद्धतीने का, इतक्या प्रमाणात किंव्हा वेगात का - ह्याचे उत्तर भगवंताकडे आहे. विचार प्रस्थापित होणे आणि त्यातून खूप सारे संबंध होणे, स्मरण होणे, चक्र होणे - हे त्याचे कार्य आहे, म्हणून ते होऊ देणे शांतीने. जर सर्व त्याची इच्छा आहे, तर विचारातून जाणवणारे अर्थ, हालचाली...त्याच्याच इच्छेने होत असलेल्या हवे! *त्याची इच्छा* - असा भाव आपल्या आत संक्रांत व्हायला हवा. त्यासाठी विचारांची धारा सुरू राहत असताना भगवंताचे चिंतन करत राहावे.
हरि ओम.
श्री
मला असं वाटतं की सर्व भगवंत करतो. आपण एक निमित्त असतो, सूक्ष्मातून येणारे आणि तसेच निघून जाणारे. येणे आणि निघून जाणे, ह्यात हेतू असावा का?!! हा महत्वाचा प्रश्न आहे जीवाला, आणि ह्या आकारात पदार्पण करून तो प्रश्न निर्माण होणार. उत्तर आहे - माहीत नाही. पण ह्याने भांबावून जाण्याची गरज नाही. उत्तर माहीत नाही, ह्यातच "शोध" हा प्रकार प्रस्थापित होतो. त्याला वेळ द्यावे. उपद्व्याप करून, व्याकुळ होऊन काय हाथी मिळते का, ह्याचा विचार करावा. सर्व योग्य वेळी योग्य गोष्टी होतील. आपण शांत रहावे आणि भगवंताचे चिंतन करावे.
चिंतन दररोज व्हायला हवे, कारण त्यातून संबंध स्वच्छ होत राहतात. धूळ साफ करण्यासारखे आहे. मन दररोज विचारातून काहीतरी निर्माण करत राहते, कुठेतरी गुंतत राहते, काहीतरी अपेक्षा ठेवते, व्याकुळ होते, धडपड करते, परिणाम भोगत राहते, चक्रात वावरत राहते. अशा वेळी नामस्मरण करण्याचा योग मनाने हाथी घ्यावा.
हरि ओम.
No comments:
Post a Comment