श्री
संवादाला महत्व असते नकळत. एक तर श्रद्धा असावी की जे काही होत आहे, जे काही घडेल, जे काही आपण करणार असतो, जे काही ध्यानी येत राहते, ते योग्य असते आणि आपल्या
हितासाठी असते. मग त्यात चर्चा, भेद, शांत
बसणे, बदल, संबंध, चिंता - सर्व काही त्यात येते.
गोष्टींच्या _होण्याला_, जो काही काळ अस्तित्व मागतो,
तो देणे गरजेचे असते. मग त्यात जन्म,मरण,
जीर्ण होणे, प्रगती, बदल
ह्या सर्व गोष्टी आल्या. गोष्टींच्या हालचाली
सूक्ष्मातून स्थूल स्थितीत _अवतरत_ राहतात
आणि गडपही होत राहतात आणि हे कार्य भगवंताची शक्ती करते. म्हणून _हालचाली_ योग्यच असतात आणि त्याच्या इच्छेने होत
राहतात.
श्रद्धा वाढवावी प्रवासात. पुढे काय लिहून ठेवले आहे, काय होईल, कसे होईल, काय देणे
लागते, कुठे जायला लागते, कसा हेलपाटा
पडू शकतो - सारे काही त्याच्या भरवसावर सोपवणे. आत्मसात होण्याच्या क्रियेला देखील
देणे लागते अस्तित्वाला आणि ते द्यावे.
होणे - हे कार्य असते - ज्यात आपण फक्त देतो. ते बुद्धीवर निर्भर नसते -
त्याच्याही पलीकडे स्थित असते, म्हणून होण्याच्या कार्यक्षमतेला भगवंताची शक्ती कारण ठरते,
बुद्धी नाही. बुद्धीने जे काही संक्रांत होते (speculation),
त्याच्याही पलीकडे अस्तित्व शक्ती कार्य करत राहते. एखादी गोष्ट
होणे, ह्याला घाबरण्याचे काय कारण असते? आपली श्रद्धा किंव्हा शुद्ध जाणीव कमी पडते. म्हणून श्रद्धा वाढवणे.
हरि ओम.
श्री
ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोण आहे, काय करतो, कुठे
जाणार असतो, काय वाटते वगैरे - हे कुणाला पटवण्यासाठी नसते.
मी कुठून येतो, हे मलाही ठाऊक नाही, तर
त्या बद्दल अडून राहण्यात काय तथ्य असते?!! तरीही लोकं
एकमेकांचे झिंझ्या उपटण्यात कमी करत नाही!
प्रवास कसा असतो, हे पूर्णपणे माहित नाही. प्रवास म्हणजेच भगवंताने आखलेला किंव्हा
त्याच्या इच्छेने संक्रांत होत राहणार. प्रत्यक्षात परिस्थिती येत राहते. तिला
सामोरे जायला लागते, त्यात दुमत नाही. आपल्या ध्यानी
गोष्टींचा प्रवाह स्थित असणार.
हरि ओम.
Shree
Emphasis to solve a problem at any cost may imply a disconnect with
surrounding concerns or less faith in deriving lessons from what the
environment seems to say.
Why does this happen?! Not very sure of this....I don't wish to assume a
deterministic stance since it is quite useless and what's the harm in admitting
and accepting that there are far subtle forces at play which can't be even
known by a thought!
It is not for us to solve any problem. A problem is a creation of the mind
and how it gets defined how it gets engaged with and what outcome comes from
it. It is never ending. A problem is a fictional idea.
The journey that has been inherited includes many problems. But that
needn't define us. The problem requires to be seen. It doesn't indicate that
there has to be an answer or one should force oneself to find out one.
Hari Om.
No comments:
Post a Comment